आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर येथे अभिषेक…

⚡देवगड ता.१७-:
शिवसेना कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे देवगड तालुका शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला. आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात यश लाभो, अशी मनोभावे प्रार्थना श्री देव कुणकेश्वर चरणी करण्यात आली. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या धार्मिक कार्यक्रमाला देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर,तुषार गावकर,अण्णा चव्हाण, प्रमोद आंबेरकर, ऋषी चव्हाण, नानेरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page