वेंगुर्ला दाभोली येथे महिलामार्फतदारूअड्यावर धाड…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावातील महिलांनी महिला ग्रामसभेत एकत्र येत दारूबंदी ठराव घेतला होता व कारवाई करण्याचे वेंगुर्ला पोलिसांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी शनिवारी धाडसत्र मोहीम राबविली होती. परंतु त्यानंतर आज गावातील महिलांनी दाभोली ख्रिश्चनवाडी येथे दारूअड्यावर एकत्र येत धाड टाकली आहे. यावेळी गोवा बनावटीची दारू आढळून आली आहे, याबाबतची माहिती सरपंच उदय गोवेकर यांच्याकडून देण्यात आली. यावेळी सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ राऊळ व बहुसंख्य महिला उपस्थित आहेत. दरम्यान संबंधित ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page