शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१७-: तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव २०२५–२६ मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना तेली, उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, सदस्य अमित गावकर, प्रियांका दळवी, अपर्णा राऊळ, सिध्दी कुडव, प्रज्ञा राऊळ, शिक्षणप्रेमी ज्ञानेश्वर राणे, संगीता राऊळ, श्रद्धा गावकर, शिक्षक सीमा सावंत आदी उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवात ५० मीटर व १०० मीटर धावणे, लांबउडी, उंचउडी, कबड्डी, खो-खो, रिले तसेच ‘ज्ञानी मी होणार’ प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली व दुसरी व तिसरी व ते चौथी अशा दोन गटांत या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. या महोत्सवाला शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सिध्देश तेंडोलकर, गोपाळ नार्वेकर तसेच विजय ठाकूर यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पालक वर्गाकडूनही या क्रीडा महोत्सवासाठी अमूल्य आर्थिक सहकार्य लाभले. स्पर्धकांसाठी सन्मानचिन्हे व पदके दत्तगुरु मित्रमंडळाच्यावतीने पुरस्कृत करण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे शेखर पाडगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाडगावकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. एकूणच शालेय बाल क्रीडा महोत्सव २०२५–२६ विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना चालना देणारा व प्रेरणादायी ठरला.

You cannot copy content of this page