उद्धव ठाकरे यांच्यासारखा टिनपाट मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही

केंद्रीयमंत्री नारायण राणे;औरंगाबाद येथे भाजपवरील आरोपाला दिले उत्तर

ओरोस ता.०९-:

बकवास, आकस v द्वेषाचे भाषण. विकासावर कधीच बोलत नाही. गेल्या ३९ वर्षात विकासासाठी मर्दांगी दाखविलेली मी पाहिली नाही. मंत्रालयात जात नाही. कबिनेतला अनुपस्थित असतात. अधिवेशनाला उपस्थिती नाही. अशाप्रकारचा टिनपाट मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र विकासात दहा वर्षे मागे गेला आहे. असा टिनपाट मुख्यमंत्री आम्हाला मिळाला, हे आमचे दुर्दैव्य आहे, असा आरोप केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.


बुधवारी औरंगाबाद येथे झालेल्या शिवसेना वर्धापन मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप व केंद्र सरकारवर आरोप केले होते. त्याला केंद्रीयमंत्री राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत एवढी खालच्या भाषेत टीका केली नव्हती. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, ती टीका मार्गदर्शन करणारी हवी, असे राणे यांनी सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत “टिनपाट, वाह्यात, कार्टी, मर्द” असे शब्द वापरले. मात्र, ते विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द बोलले नाहीत. ज्या शहरात सभा घेतली त्या औरंगाबादच्या नागरिकांना सात दिवसांनी पाणी मिळते. त्यासाठी १६८० कोटींची मंजुरी दिलेल्या योजनेला स्थगिती का दिली ? ते सांगितले नाही, असे सांगतानाच वर्धापन दिन पक्षाचा होता. मग आपल्या पक्षाने काय केले ? किती जणांना रोजगार दिला ? किमान हे तरी बोलणे अपेक्षित होते, असे सांगितले.

You cannot copy content of this page