⚡मालवण ता.१६-:
मालवण येथील अष्टपैलू कलानिकेतन या संस्थेतर्फे आयोजित सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत विविध गटातून मैत्री मालवणकर, गौरी वस्त, कौस्तुभ धुरी यांनी गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धकांनी विविध नाट्य वेशात सादर केलेल्या नाट्यगीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत स्पर्धकांचे कौतुक केले.
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, ज्येष्ठ कलाकार रतिलाल तारी, परीक्षक संजय धुपकर (गोवा), भाई शेवडे (धारगळ), अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर, सुधीर कुर्ले, विलास देऊलकर, कीर्तन विशारद, महेश धामपूरकर, सौ.राजश्री तारी, मंदार लुडबे, अभय कदम आदि व इतर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – बालगट – प्रथम – मैत्री मालवणकर, द्वितीय – कृपा केदार साळगावकर, तृतीय वेद नारायण चव्हाण, उत्तेजनार्थ – श्लोक निलेश सामंत, खुशी वामन मेस्त्री, शर्वाणी बाबुराव आपटे. कुमारगट – प्रथम – गौरी राजन वस्त, द्वितीय तनुश्री निलेश मराठे, तृतीय – दुर्वा महेंद्र पराडकर, उत्तेजनार्थ सुखी श्रीकृष्ण सामंत, नमिता वामन शेणई, भूमी आशिष नाबर. खुलागट – प्रथम – कौस्तुभ संतोष धुरी, द्वितीय – गंगाराम अच्युत प्रभूराळकर, तृतीय – नितीन पांडुरंग कोळंबकर, उत्तेजनार्थ – तेजल विश्राम परब, ऋषिकेष विश्वनाथ चव्हाण, श्वेता विजय यादव.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर, ऍड. दिलीप ठाकूर, सुनील परुळेकर, उद्योजक संजय गावडे आदी व इतर उपस्थित होते.
या स्पर्धेचे परीक्षण संजय धुपकर वं भाई शेवडे यांनी केले. तर तबला साथ सुधीर गोसावी, ऑर्गन साथ भालचंद्र केळुसकर यांनी दिली. सूत्रसंचालन ऍड. प्रथमेश सामंत, ऍड. पलाश चव्हाण, विनोद सातार्डेकर यांनी केले. आभार सहसचिव सुधीर कुर्ले यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अष्टपैलू कलानिकेतन मालवण संस्थेच्या सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
