बांदीवडे येथे महिला दिन साजरा…

⚡मालवण ता.१६-:
बांदीवडे केंद्र शाळा नं. १ येथे उपसरपंच श्री. पुष्पक अनिल घाडीगांवकर व ग्रा.पं. सदस्य श्री.नारायण यशवंत परब यांच्यावतीने जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमानी साजरा झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, स्वराज्य व सेवते प्रतिष्ठान संघटनेच्या अध्यक्ष, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गच्या सल्लागार सौ.शिल्पा यतीन खोत व प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शिल्पा झाट्ये उपस्थित होत्या. यावेळी सौ. खोत व डॉ. झाट्ये यांनी महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात सर्व माजी महिला सरपंच, उद्योजिका, माजी मुख्यध्यपिका, आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, तसेच पोलीस पाटील, ग्रामस्थ, महिला यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी आयोजित फनी गेम्समध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत त्यातील विजयी महिलांना आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात आली. यावेळी बहुसंख्य महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हा कार्यक्रम आप्पा दिनकर परब, सोनू सुधाकर सावंत, प्रकाश परब, योगेश सावंत, प्रदीप परब, आशिष नाबार यांच्या सौजन्याने संपन्न झाला.

You cannot copy content of this page