लॅपटॉप देत पुढील शिक्षणाला दिल्या शुभेच्छा
ओरोस ता.०९-:
बारावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या मुलींचा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज पडवे येथे लॅपटॉप देवून सन्मान केला. तसेच पुढील शिक्षणाला शुभेच्छा दिल्या.
बारावी परीक्षेत प्रथम आलेली दीक्षा तोंडवळकर, द्वितीय आलेली गायत्री कोरगांवकर या मुली यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत, दादा साईल आदी उपस्थित होते.