स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत उपक्रम:मंदार शिरसाट आणि लायन्स क्लब यांचा पुढाकार..

⚡कुडाळ ता.१७-: ‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम अंतर्गत नगरसेवक मंदार शिरसाठ व लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला. रिटायर्ड जीएसटी डेप्युटी कमिशनर गणेश दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोकणातील असलेली मुलांची हुशारी याचा चांगला वापर व्हावा व त्यांना चांगला मार्ग मिळावा यासाठी मंदार शिरसाठ व लायन्स क्लब यांच्या विद्यमातून स्तुत्य उपक्रम करण्यात आला होता.
या कार्यक्रमास 200 विद्यार्थी पालक व शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी लायन्स क्लब कुडाळ अध्यक्ष आनंद कर्पे, सी. ए.सौदागर, मनोज वालावलकर, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे मॅडम,बलायन्स क्लबचे जीवन बांदेकर, स्नेहांकिता माने, डॉक्टर चुबे, सी. ए.सागर तेली, श्री. कोरगावकर सौ. चुबे, श्रीनिवास नाईक, मंजुनाथ फडके, प्रा. डॉ. लोखंडे सर व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सी. ए. सुनील सौदागर यांनी बोलताना विविध बँकांच्या परीक्षा कशा द्याव्यात याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
तसेच मंदार शिरसाठ यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले
तसेच डेप्युटी कमिशनर गणेश दळवी यांनी पूर्ण स्पर्धा परीक्षा कशी द्यावी, त्याच प्रकारे इंटरव्यू कशाप्रकारे देण्यात यावा व कोणत्या विषयास किती मार्क असतात व स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
त्याचप्रकारे आनंद करपे यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून अशा प्रकारचे विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे उपक्रम हाती घेता येतील ते घेणार असल्याचे सांगितले.
तसेच कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव यांनी स्वतः स्पर्धा परीक्षा देताना आलेल्या अडचणी व त्यांना असे तोंड द्यावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले. त्याच प्रकारे शासनाच्या कोणत्या योजना आहेत त्याची देखील माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यापुढे असेच विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम घेण्यात असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.

You cannot copy content of this page