मालवण ग्रामीण रुग्णालयात आयुष शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.१७-:
नॅशनल आयुष मिशन अंतर्गत आयुष कक्ष ग्रामीण रुग्णालय मालवण येथे सोमवारीआयुष शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभून विविध आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आयुष शिबिराचे उदघाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी आयुष विभाग जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून आयुर्वेद तज्ञ म्हणून डॉ. योगेश गोडकर व होमियोपॅथी तज्ञ म्हणून डॉ राजेश पालव यांनी सेवा दिली. या आयुष शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या अल्पोपहाराची व्यवस्था रुग्णालय व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती.

या शिबिरात संधिवात (सांधे व गुडघेदुखी), पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग (खाज, खुजली, एक्झिमा), पचनाचे त्रास (अम्लपित्त, बद्धकोष्ठता), श्वसनाचे आजार (दमा, सर्दी, खोकला) आदी आजारावर मोफत आयुर्वेदिय व होमियोपॅथी तपासणी करून औषध वितरण करण्यात आले. तसेच मधुमेह व उच्चरक्तदाब मार्गदर्शन व स्त्रीरोग व बालरोग बाबत रुग्णांना सल्ला देऊन मार्गदर्शन करण्यात आले. शिबीर यशस्वीपणे पार पडल्याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page