⚡मालवण ता.०९-: बारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच दांडी येथील रहिवासी हर्षिता ढोके हिचा शिवसेनेतर्फे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
बारावी परीक्षेत टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता पांडुरंग ढोके हिने ८९.३३ टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. तिच्या या यशावद्दल शिवसेनेच्या वतीने आज तिचा निवासस्थानी पेढा भरवीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षिता हिचे आई, वडील अन्य कुटुंबीय, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक पंकज सादये, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले, युवासेनेचे मंदार ओरसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षिता हिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, तालुक्यात तृतीय आलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या अतिकुरेहमान अंसारी याचाही त्याच्या निवासस्थानी जात सत्कार करण्यात आला.