नांदगाव येथील महामार्ग प्रश्न न सोडवल्यास उपोषण

नागेश मोर्ये यांचा इशारा;चुकीच्या कामामुळे शेतीत पाणी घुसणार

⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रीय महामार्गासाठी नांदगाव येथील काही क्षेत्र संपादित होत आहेत . परंतु गट नंबर २२८६ जमीन बिनशेती असून संपूर्ण क्षेत्र रस्त्यास गेलेले नाही . तसचे गट नंबर २२८५ मधील काही जमीन संपादनासाठी गेलेली आहे . गट नं . २२८६ समोर जो कॉजवे आहे त्यासमोर दोन फुटावर भिंत घातल्यामुळे तो चॉकअप होऊन खालच्या मुस्लिमवाडीतील परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी भरून ओटव माईण रस्ता व हायवेवर जाणार आहे . यामुळे भविष्यात ट्रैफिक जाम होणार आहे , शिवाय लोकांचे नुकसान होणार आहे . तरी सदरच्या नाल्याच्या पाण्याचा योग्यरितीने निचरा करण्यासाठी कार्यवाही करावी . तसेच अन्य काही प्रश्नांची तात्काळ सोडवणूक व्हावी अन्यथा उपोषणास बसणार असल्याचे माजी जि . प . सदस्य नागेश मोरये यांनी कणकवली प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की , वरील नाल्याचे पाणी हायवेवर येऊन परिसरातील लोकांना त्रास झाल्यास महसूल विभाग , कार्यकारी अभियंता , उपअभियंता महामार्ग तसेच कार्यकारी अभियंता सा.बां . विभाग हे जबाबदार असणार आहेत . जि . प . शाळा नांदगाव नं . १ जवळील गटारामध्ये पाणी हायवेवर घुसते हायवे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसतात . त्याचा त्रास लोकांना होतो . नांदगाव मोरयेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर संपादित रस्ता झाल्यापासून गेली चार वर्षे पाणी भरून रस्ता पाण्याखाली जातो . याबाबत तीन वर्ष अर्ज देऊनही कार्यवाही झालेली नाही . नांदगाव ते बेळणे या ठिकाणच्या दुतर्फा संपादित क्षेत्राच्या हद्दी निश्चित करण्यात याव्यात , अन्यथा भविष्यात बेरोजगारांनी स्टॉल बांधल्यानंतर नांदगाववासीय महामार्ग प्राधिकरणचे ऐकून घेणार नाहीत . नांदगाव ग्रा.पं. ने निवेदनाद्वारे दिलेली कामे तात्काळ करण्यात यावीत . नांदगाव शाळा नं . १ कॉजवेजवळ संरक्षक भिंती बांधल्या नाहीत , गटारेसुध्दा कोसळत आहेत . तरी या प्रश्नांची १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे नागेश मोरये यांनी म्हटले आहे .

You cannot copy content of this page