गोव्यातील प्रसिद्ध “द रुस्टर” कॅफे आजपासून सेवेत
⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीतील खवय्यांसाठी गोव्यासह मोठ्या मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या “द रुस्टर” कॅफे सावंतवाडीत आजपासून सुरू होत असून, चिकन खवय्यांना आता अजुन वेगवेगळ्या प्रकारचे चिकनचे पदार्थ खायला मिळणार आहेत.
चिकन ग्रिल, शोरमा, चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी, चिकन अल्फाम यासारखे विविध पदार्थांची चव आता सावंतवाडीत चाखता येणार आहे. सावंतवाडीतील इम्तियाज वीरानी आणि रियाज मलानी या दोन उद्योजकांच्या माध्यमातून हा कॅफे सुरू होत असून, आता शहरातील खवय्याना बाहेर जाण्याची गरज नाही, असे मत त्या दोघांनी व्यक्त केले आहे.