अखेर ‘तो’ खचलेला फुटपाथ पूर्ववत करण्याचे काम सुरू…
ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वेधले होते लक्ष… ⚡सावंतवाडी ता.१७-: येथील मोती तलावाचा फूटपाथ पहिल्याच पावसात खचला असून, त्यामुळे तेथून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ‘तो’ धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. याबाबत सर्वात प्रथम ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. याची अखेर दखल घेतली असून, आज पासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे….
