अखेर ‘तो’ खचलेला फुटपाथ पूर्ववत करण्याचे काम सुरू…

ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वेधले होते लक्ष…

⚡सावंतवाडी ता.१७-: येथील मोती तलावाचा फूटपाथ पहिल्याच पावसात खचला असून, त्यामुळे तेथून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी ‘तो’ धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. याबाबत सर्वात प्रथम ग्लोबल महाराष्ट्र चैनलने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. याची अखेर दखल घेतली असून, आज पासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक वृत्त अस की सावंतवाडी आणि शहराचे सौंदर्य असलेला मोती तलावाचा फुटपाथ सारस्वत बँकेच्या समोर खचला आहे. पहिल्याच पावसात हा प्रकार घडला असून अन्य ठिकाणी ही फुटपाथ खचण्याची शक्यता निर्माण झाली होती. पालिकेने वेळीस यावर उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत होती याबाबत ग्लोबल महाराष्ट्र चैनल पालिकेचे लक्ष वेधले होतं. अखेर त्याची दखल घेऊन आजपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी देखील लक्ष वेधले होते.

You cannot copy content of this page