राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने युवतींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप…

युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांच्या माध्यमातून युवतींसाठी अनोखा उपक्रम…

⚡सावंतवाडी,ता.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत, त्यानुसार दिनांक १७ जून रोजी सावंतवाडी शहरातील न्यू खासकिलवाडा समाज मंदिर परिसर, सर्वोदय नगर व लाखे वस्ती या ठिकाणी युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांच्या तर्फे मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब,सावंतवाडी नगरपालिका माजी नगरसेविका सौ.ज्योती पाटणकर, महिला बचत गट अध्यक्ष सौ.सारिका कोटेकर, स्वाती पालयेकर, नयना अणावकर, कल्पना पालयेकर, गितांजली परब, ज्योती पालयेकर, रूपाली अणावकर, विजया परब, भावना खोरागडे,3 सानीया पाटील, प्रेरणा पाटील, दिया लाखे, रसिका पाटील, सुवर्णा पाटील, सोनाक्षी लाखे, दर्शना लाखे, श्वेता लाखे, ललिता पाटील, सुवर्णा पाटील, सोनाक्षी लाखे प्रतिक्षा खोरागडे, नेहा लाखे बचत गटातील अन्य महिलां व आदी युवती उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page