⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान या विषयांबरोबरच बीएससी आयटी ,बीएससी कम्प्युटर सायन्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स या विषयांचीही प्रवेशप्रक्रिया महाविद्यालयात सुरू झालेली आहे पदवी प्रवेश प्रक्रियेबरोबरच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एम ए हिंदी , एम ए इंग्लिश ,एम ए अर्थशास्त्र ,एम एस्सी रसायनशास्त्र, एमएस्सी प्राणीशास्त्र , एम एस्सी वनस्पतीशास्त्र , एमकॉम या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे.
या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कला शाखा डॉ सौ पी जी नाईक, डॉ एस एम बुवा 9422810226, विज्ञान विभाग डॉ जी एस मर्गज 9420209013, डॉ डी बी शिंदे 7066175697, वाणिज्य विभाग प्रा.एस. ए. देशमुख 7875582850 पदव्युत्तर अभ्यासक्रम व अनएडेड कोर्सेस साठी रामचंद्र परब 9423588202 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले आहे
