एस्टी प्रवासास नकार देणाऱ्या वाहक चालक विरोधात मच्छी विक्रेत्या महिला आक्रमक…

वैभववाडी प्रतिनिधी
एसटीतून प्रवास करण्यास विरोध करणाऱ्या वाहक-चालक यांच्या विरोधात कोळपेतील महिला मच्छी विक्रेत्यांनी वैभववाडी बसस्थानकाला घेरावा घातला. महीला विक्रेत्यांशी उर्मट भाषेत बोलणा-या त्या एसटी कर्मचाऱ्यांना भाजपा पदाधिकारी व महिला विक्रेत्यांनी खडे बोल सुनावले. भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी वाहतूक नियंत्रक व चालक, वाहक यांना धारेवर धरले. यापुढे महीला विक्रेत्यांना प्रवासात अडथळा केल्यास बसस्थानकात शेकडो मच्छी विक्रेत्यांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा काझी व लांजेकर यांनी दिला आहे.

यावेळी वैभववाडी तालुका अध्यक्ष नासीर काझी, सरपंच हुसेन लांजेकर, बाबालाल लांजेकर, माजी सभापती शुभांगी पवार, सामाजिक कार्यकर्ते डी.के. सुतार व महिला विक्रेत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भोवड उपस्थित होते. महिला विक्रेत्या जांभवडे, भुईबावडा, तिरवडे, उपळे या भागात आपला पारंपारिक मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. मच्छी विक्रेते एसटीने प्रवास करतात. परंतु काही चालक व वाहक हे त्यांना एसटीतून प्रवास करण्यास मनाई करत आहेत. याच्या विरोधात या महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट बसस्थानक गाठले.

You cannot copy content of this page