Headlines

Global Maharashtra Breaking News

खर्डेकर महाविद्यालयात विविध आसनांची प्रात्यक्षिके

⚡वेंगुर्ला ता.२१-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योगा प्रशिक्षिका मिनाक्षी आरावंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रार्थना, पुरक हालचाली, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, भुजंगासन, प्राणायाम, ध्यानासन, कपालभाती इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

Read More

वेंगुर्ला न्यायालयात योगदिन साजरा

⚡वेंगुर्ला ता.२१-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी दिवणी न्यायालय वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

Read More

जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची पाहणी

दुरुस्तीसाठी निधी देणार; अंदाजपत्रक सादर करण्याची बांधकाम विभागास सूचना ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-:जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज येथील क्रीडा संकुलामधील शासकीय जलतरण तलावाची सविस्तर पाहणी केली. तलावाच्या दुरुस्तीसाठी प्राधिकरणामधून निधी देणार असल्याचे सांगून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना उपअभियंता विनायक जोशी यांना दिली.

Read More

डंपरची धडक बसून वृद्धाचा जागीच मृत्यू

⚡वेंगुर्ला ता.२१-: दाभोली-हळदणकरवाडी येथील गुरांसाठी चारा नेणारा बाबुराव उर्फ बाबलो गंगाराम मयेकर (६३) हा दाभोलीकडे जाणा-या खडी चाहक डंपर केए-७०-३०८७ ची धडक बसून पाठीमागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Read More

विधान परिषदेच्या विजयाचा वेंगुर्ले येथे भाजपाकडून मिठाई वाटून जल्लोष

⚡वेंगुर्ले ता.२१-: विधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने आज मंगळवार २१ जून रोजी वेंगुर्ले तालुका भाजप च्या वतीने तालुका कार्यालया समोर मिठाई वाटून व भाजपच्या विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,…

Read More

महाविकास आघाडीतील नाराजीमुळे राजकीय खलबते सुरू

कोकणातील आमदार आता भाजपला साथ देतील:भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर प्रतिक्रिया ⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्रात आता सुरू असलेली खलबलते हे नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नाराजीमुळे पुन्हा दिसून आली आहेत, त्यामुळे आता कोकणातील आमदार देखील आता भाजपलाच साथ देतील, असा विश्वास माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार…

Read More

पेढे भरवीत केली फटाक्यांची आतषबाजी

संजू परब यांच्या कार्यालयात भातपचा जल्लोष:विधान परिषद निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये उत्साह सावंतवाडी : विधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने सावंतवाडी येथे संजू परब यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्याची अतिषबाजी व भाजप विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सवही साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते

Read More

जिल्ह्यात २५ जून पासून कृषी संजीवनी मोहीम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन ओरोस ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत ” कृषि संजिवनी ” मोहिम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Read More

जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी योगा उत्तम पर्याय

जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी:सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योगा दिन साजरा ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीतही योग साधनेच्या जोरावर मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तमरित्या राखले जाऊ शकते याचा प्रत्यय आलेला आहे. शासकीय अधिकारी असो वा विद्यार्थी असोत जीवनामध्ये ताण तणाव मुक्त रहायचे असेल तर योगाला पर्याय नाही. मानवी जीवनात मानसिक आणि शारीरिक उत्तम आरोग्यासाठी योग महत्वाचा आहे. सर्वांनी…

Read More

ज्ञानदीप मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी आमदार निधीतून आर्थिक सहकार्य मिळावे

सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्यावतीने आमदार बाळाराम पाटील यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना सोमवारी त्यांनी शिक्षक संवाद कार्यक्रमांतर्गत सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी विद्यालयात शिक्षकांशी संवाद साधला. याच दरम्यान सावंतवाडी शहरात गेली अनेक दशके शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानदीप शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page