खर्डेकर महाविद्यालयात विविध आसनांची प्रात्यक्षिके

⚡वेंगुर्ला ता.२१-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. योगा प्रशिक्षिका मिनाक्षी आरावंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रार्थना, पुरक हालचाली, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, भुजंगासन, प्राणायाम, ध्यानासन, कपालभाती इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

  प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले योगाचे मार्गदर्शन थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ.धनश्री पाटील, क्रिडा संचालक जे.वाय.नाईक, सुरेंद्र चव्हाण, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.के.आर.कांबळे, प्रा.आर.जी.चौगले, प्रा.एस.सी.चुकेवाड, प्रा.बी.जी.गायकवाड, प्रा.हेमंत गावडे, प्रा.बी.बी.जाधव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
You cannot copy content of this page