दिनेश हळदणकर यांची मागणी
⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ असून ते ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या नावासहीत पूर्ण आडनावसह देण्यात यावे अशाप्रकारचे निवेदन वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश हळदणकर यांनी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांना दिले आहे.
पूर्वी या सभागृहाला ‘शिवाजी सभागृह‘ असा एकेरी उल्लेख होता. हे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह‘ असे होण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर या सभागृहाला ‘शिवाजी सभागृहा‘ ऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृह‘ असे नाव देण्यात आले. आता संबंधीत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या वडिल व आडनावासह पूर्ण स्वरुपात सभागृहाला द्यावे अशी मागणी हळदणकर यांनी केली आहे आणि असे केल्यास सर्वप्रथम नाव देण्याचा बहुमान वेंगुर्ला नगरपरिषदेस मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
