⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था सिंधुदुर्ग संचलित डॉ. वसुधाज योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी यांच्या सहयोगाने नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राम पोळजी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, कार्यकारी अधिकारी संगिता कुबल, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर, डॉ. राजेश्वर उबाळे, सिंधुदुर्ग योग प्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश नवांगुळ, डॉ. दिपाली पालयेकर, कु.मारीया आल्मेडा आदी उपस्थित होते. नवाबाग शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगनृत्य सादर केले. तर योगदिनाच्या प्रथेप्रमाणे डॉ.दिपाली पालयेकर आणि कु.मारीया आल्मेडा यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला. तसेच डॉ.योगेश नवांगुळ आणि मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी योगसाधकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य योगसाधक व नागरिक उपस्थित होते.
