सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडीमध्ये योगा करताना छोटी बालके
⚡सावंतवाडी ता.२१-: शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या छोट्या बालकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके करून सर्वांचीच मने जिंकली
महिला व बालकल्याण शहर विभागाच्या अंगणवाडी क्रमांक 66 मध्ये तीन वर्षावरील बालकानी योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके केली या शाळेमध्ये यंदापासून इयत्ता पाचवी चा वर्ग सुरू झाला असून गेल्या काही वर्षापासून अंगणवाडी सुरू आहे या अंगणवाडी ची पटसंख्या सर्वाधिक असून यंदा अंगणवाडीची पटसंख्या 45 इतकी आहे तर अंगणवाडीतून 22 हून अधिक मुले इयत्ता पाचवीमध्ये गेली आहेत
या अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम घेतले जातात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंगणवाडीतील या बालकाने विविध प्रकारचे योग प्रकार करून योग दिनाचे औचित्य साधले त्यांना योगाचे प्रात्यक्षिके अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार व मदतनीस सौ.अमिषा सासोलकर यांनी दाखविली
