शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे २५ रोजी आयोजन

⚡मालवण ता.२१-: करिअर गायडन्स आणि प्लेसमेन्ट सेल, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्यावतीने दि. २५ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सिंधुदुर्ग महाविद्यालयात निशुल्क “शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

शासकीय नोकरी म्हणजे केवळ UPSC व MPSC असे नाही, केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या विविध विभागा द्वारे व वेगवेगळ्या मंत्रालया अंतर्गत विविध पदांची भरती प्रत्येक वर्षी करत असते. यातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना माहित देखील नाहीत सदर परीक्ष्यांची माहिती त्याचे स्वरूप , निवड पद्धती, परीक्षा पद्धत, अभ्यासक्रम याची माहिती विद्यर्थ्याना व्हावी हा उद्देश ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी केली आहे.

You cannot copy content of this page