शिवसेनेतर्फे नांदोस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने नांदोस येथे दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी दहावी मधील उत्तीर्ण विद्यार्थी समुध्दी श्रीकुष्ण गावडे, लिना विलास शिंदे, पुर्वा मनोज नांदोसकर, दिपिका सुरेश यादव, प्रथमेश माने, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तेजल प्रविण चव्हाण, जान्हवी राजन गावडे, अभिषेक विनोद गगनग्रास आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, शिवसेना महिला विभाग संघटक सौ. प्रज्ञा चव्हाण, काकू गावडे, माजी सरपंच अशोक नांदोसकर, सरपंच सौ. नांदोसकर, पार्टे मॅडम, शाखा प्रमुख राजू गावडे, ग्रा. पं. सदस्य हंजनकर, पालकवर्ग, विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page