सिंधुदुर्ग महाविद्यालय व ५८ महाराष्ट्र बटालियन तर्फे योगा दिन साजरा

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी व एनएसएस विभाग आणि ५८ महाराष्ट्र बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी सकाळी मालवण बंदर जेटी येथे साजरा करण्यात आला. यावेळी बटालियनच्या जवानांसह प्राध्यापक, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत विविध योगा प्रात्यक्षिके सादर करून योगाभ्यासाचे महत्व पटवून देण्यात आले.

मालवण बंदर जेटी येथे सकाळी सात वाजल्यापासून या उपक्रमास प्रारंभ झाला. सुरुवातीस एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत सर्वांचे स्वागत केले. यावेळी योग प्रशिक्षिका प्रतीक्षा गावडे (सावंतवाडी कॉलेज) हिच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने केली. तसेच प्रतीक्षा गावडे हिने प्रत्येक योगासनचे महत्व विशद करून सांगितले. तर अखिल भारतीय आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या मालवण शाखेचे डॉ. राहूल पंतवालावलकर यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्व, योगा कसा करावा, योगातून चित्त एकाग्र कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एम. आर. खोत यांनी केले. या उपक्रमात ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर दीपक दयाल, एडम अफसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंदर सिंग, सुभेदार तुकाराम, सुभेदार इंद्रकेस, नायब सुभेदार जितेंद्र कुमार, हवालदार शिवशंकर, हवालदार महेश पंवार, हवालदार रामकरण, हवालदार प्रकाशकुमार यांसह प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, माजी प्रा. आर. एन. काटकर, एनएसएस ऑफिसर प्रा. शंकर खोबरे, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एच. एम. चौगले, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. कैलास राबते, प्रा. हारगिले, प्रा. सौ. स्नेहा बर्वे, प्रा. हसन खान, प्रा. सौ. अन्वेषा कदम, प्रा. मिलन सामंत, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. निकिता राऊळ, प्रा. रतन सोनवडेकर, प्रा. मेस्त्री, श्री. साळुंखे, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, अभय कदम, सौ. दीपा वनकुद्रे यांच्या योगज्योती ग्रुपच्या विद्यार्थिनी सौ. अनुष्का चव्हाण, सौ. कमल बांदकर, सौ. नंदिनी गावकर, सौ. केतकी सावजी यांसह एनएसएस, एनसीसी व कट्टा कॉलेजचे विद्यार्थी- विद्यार्थिनी आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page