⚡वेंगुर्ला ता.२१-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी दिवणी न्यायालय वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला सकाळी ६ ते ७ या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे थेट प्रक्षेपण प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर ७ ते ७.४५ या वेळेत योग प्रशिक्षक अभिषेक नाईक यांनी योगाबाबत विस्तुत माहिती सांगून उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करुन घेतली. यावेळी २० न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
