डंपरची धडक बसून वृद्धाचा जागीच मृत्यू

⚡वेंगुर्ला ता.२१-: दाभोली-हळदणकरवाडी येथील गुरांसाठी चारा नेणारा बाबुराव उर्फ बाबलो गंगाराम मयेकर (६३) हा दाभोलीकडे जाणा-या खडी चाहक डंपर केए-७०-३०८७ ची धडक बसून पाठीमागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

  या घटनेचे वृत्त समजताच सरपंच उदय गोवेकर, पोलिस पाटील जनार्दन पेउणेकर, कोतवाल सुभाष खानोलकर, मिलन चव्हाण, उपसरपंच सुभाष खानोलकर, खानोली ग्रामसेवक अंधारी यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरुन पुढील प्रवासासाठी जात असलेल्या वेंगुर्ला-दाभोलीमार्गे वेंगुर्लाकडे येणा-या एसटी बस गाड्या व अन्य खाजगी गाड्याही अपघाताच्या दुस­-या बाजूला अडकून पडल्या होत्या. हा अपघात ज्या ठिकाणी घडला त्याठिकाणाहून बाबुराव मयेकर यांचे घर सुमारे ७०० मीटर अंतरावर आहे.
You cannot copy content of this page