ज्ञानदीप मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी आमदार निधीतून आर्थिक सहकार्य मिळावे

सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्यावतीने आमदार बाळाराम पाटील यांना निवेदन

⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना सोमवारी त्यांनी शिक्षक संवाद कार्यक्रमांतर्गत सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी विद्यालयात शिक्षकांशी संवाद साधला. याच दरम्यान सावंतवाडी शहरात गेली अनेक दशके शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ज्ञानदीप शिक्षण मंडळ सावंतवाडीच्यावतीने आमदार बाळाराम पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच आमदार बळीराम पाटील यांच्याकडे ज्ञानदीप मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी आमदार निधीतून आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक वाय. पी. नाईक यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी लवकरच आपण ज्ञानदीपला योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन देत ज्ञानदीप मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुकही केले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डान्टस, महिला आघाडीच्या नेत्या अर्चना घारे-परब, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, ज्ञानदीपचे अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, प्रा. रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page