बांदा भाजपने साजरा केला आनंदोत्सव

विधान परिषद निवडणुकीत पाचवा आमदार निवडून आल्याने उत्साह;देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा केला जयघोष

बांदा /प्रतिनिधी
विधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने बांद्यात बांदा भाजप मंडलाच्या वतीने फटाक्याची अतिशबाजी व भाजपच्या विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.


यावेळी मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती शितल राऊळ, तालुका सरचिटणीस मधुकर देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादू कविटकर, उपाध्यक्ष सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, विभागिय अध्यक्ष गुरु सावंत, सोशल मिडीया अध्यक्ष बाबा काणेकर, शक्ति केंद्र प्रमुख प्रविण देसाई, सिध्देश महाजन, संतोष सावंत आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page