वाढदिवसानिमित्त अमित सामंत यांच्या कार्याचा ‘ग्लोबल महाराष्ट्रा’ने घेतलेला आढावा
⚡सिंधुदुर्ग दि.२१-: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे पंचवीस वर्षांहून अधिक काळ राजकारणामध्ये सक्रिय आहेत. पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहून त्यांनी राजकीय, सामाजिक कार्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे पवार यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते काम करत आहेत. अमित सामंत यांच्याविषयी सर्वसामान्य मतदार संघ कार्यकर्त्यांच्या मनात विश्वासाचे नाते आहे. जनतेच्या मनावर राज्य करणारा युवा नेता अशी त्यांची ओळख आहे.श्री.सामंत यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. “त्या” निमित्त ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आढावा.
श्री.सामंत हे ज्येष्ठ नागरीक, तरुण, महिला या सर्वांना सामावून घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, शेतीविषयक, सहकार शिक्षण या सर्व क्षेत्रातील प्रश्न वेगळे आहेत. त्या त्या प्रश्नांची जाणीव ठेवून अमित सामंत कार्यरत आहेत. अखंड काँग्रेसपासून ते विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले आहेत. १९९४ मध्ये मुंबईत त्यांनी काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली.
सामंत यांचा राजकीय प्रवास कुडाळ शहरातून सुरू झाला.जिल्ह्याबरोबरच तालुक्याच्या विकासाबाबत जनतेच्या सुखदुःखात नेहमीच लक्ष देण्याचे काम त्यांनी केले. याची पूर्ण जाणीव असल्याने ते कार्यतत्पर राहिले. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात कधीच राजकारण केले नाही, पक्षीय भेदभाव केला नाही. राजकारण आणि समाजकारण या दोघांचा मेळ घालून काम करणे आजच्या बदलत्या राजकारणात अवघड गोष्ट आहे; मात्र हा ताळमेळ घालून समाजकारणात गेली २७ वर्षे कार्यरत राहून सक्रिय राजकारण करणाऱ्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यांच्या कार्याला ग्लोबल महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा सलाम.
