महाविकास आघाडीतील नाराजीमुळे राजकीय खलबते सुरू

कोकणातील आमदार आता भाजपला साथ देतील:भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर प्रतिक्रिया

⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्रात आता सुरू असलेली खलबलते हे नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये असलेल्या नाराजीमुळे पुन्हा दिसून आली आहेत, त्यामुळे आता कोकणातील आमदार देखील आता भाजपलाच साथ देतील, असा विश्वास माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राजसभा व विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार घडून आणला तसेच ते आता देखील चमत्कार घडवून आणतील असा व पुन्हा एकदा किंगमेकरची भूमीका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते भाजपच्या विजयाच्या आनंदोसत्व साजरा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी संजू परब; अजय गोंदावळे, आनंद नेवगी,मनोज नाईक,सुधार आडिवरेकर,राजू बेग, दिपाली भालेकर,दिलीप भालेकर,परिक्षीत मांजरेकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page