मुंबई हायअलर्टवर, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी
⚡मुंबई दि.२५-: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून शिवसेनेला धक्का दिला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात सुरुवात झाली आहे. याचीच खबरदारी घेत मुंबईमध्ये आता जमावबंदी लागू कऱण्यात आली आहे. राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार…
