शिवसैनिकांचा निश्चय;सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सुरु केला आढावा बैठक दौरा
⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात आजपासून शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी तालुका दौरा सुरु केला आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी घेत आढावा बैठक घेण्यात आली. आज पहिली बैठक कोलगाव जि. पं. मतदार संघाची माजी जि. पं. सदस्य मायकल डिसोजा यांचा घरी पार पडली. महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहे त्याबाबत सुद्धा चर्चा झाली यामध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकत्याचे मत विचारात घेण्यात आले की कोणतंही संकट येऊंदे आम्ही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असून आम्ही डगमगणार नाही असा निश्चय शिवसैनिकानी केला आहे.
यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडी तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे, माजी जि प सदस्य मायकल डिसोझा, माजी पं स सदस्य मेघशाम काजरेकर, प्रशांत कोठावळे,विभागप्रमुख नामदेव नाईक,गुणाजी गावडे,ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे,गौरी करमळकर, मारिया डिमेलो,संदीप गवस,अमर नाईक, विद्या कंडरकर यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
