शिवसेनेशी एकनिष्ठ राहील्याने आम.वैभव नाईक यांचे राष्ट्रवादीने केले स्वागत

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षात जोरदार राजकीय बंडाळी झाली असतानाही कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आम.वैभव नाईक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आनंत पिळणकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page