घटनेने जुने गोवा परिसरात खळबळ*
⚡पणजी दि.२४-: गोवा येथील खांडोळातील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापिका गौरी आचारी (३७) हिचा गळा आवळून खून केलेला तिचा मित्र व जिम ट्रेनर गौरव प्रकाश बिद्रे (३६, सध्या रा. ओल्ड गोवा मूळ रा. सावंतवाडी) याला जुने गोवे पोलिसांनी गजाआड केले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या घटनेने जुने गोवे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
हा खून एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. जुने गोवे पोलिसांना या खुनाचा २४ तासात छडा लावण्यात यश मिळवले. संशयिताला रिमांडसाठी उद्या न्यायालयात उभे केले जाणार आहे.
