Headlines

Global Maharashtra Breaking News

रस्त्यावर झाड कोसळल्याने बांदा – दोडामार्ग वाहतूक ठप्प….

बांदा/प्रतिनिधीबांदा -दोडामार्ग राज्य मार्गावार पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड पडले त्यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टाळली. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता…

Read More

विठ्ठल मंदिरात १० पासून कीर्तन

ह भ प रोहिणीताई माने परांजपे सांगणार कीर्तन ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी विठ्ठल मंदिर मध्ये हरिनाम सप्ताह व आषाढी एकादशी उत्सव निमित्त रविवार 10 जुलै ते बुधवार 13 जुलै या कालावधीत ह.भ. प.सौ. रोहिणीताई माने- परांजपे (पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केलेले आहे. संवादिनी- कौस्तुभ परांजपे, तबला- किशोर सावंत, ऑर्गन- निलेश मेस्त्री हे त्यांना साथ देणार…

Read More

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याने अर्चना घारे परब यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग वासीयांतर्फे दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०५-: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आल्याने आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी आज पवार यांची भेट घेतली. यावेळी घारे यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या .

Read More

राष्ट्रवादीच्या शुभेच्छा…भाजपचे सुधीर आडीवरेकर चांगलेच चर्चेत

वाढदिनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये भाजपचे प्रबळ उमेदवार म्हणून सुधीर आडिवरेकर यांच्याकडे पाहिले जात असून, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्याने शहरात…

Read More

देवगड महाविद्यालयात ६ रोजी “नैसर्गिक शेती” कार्यशाळा

उन्नत भारत अभियान, कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचा संयुक्त उपक्रम देवगड (प्रतिनिधी)देवगड महाविद्यालय ‘उन्नत भारत अभियान’ व कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस , सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सप्ताहानिमित्त दिनांक ६ जुलै २०२२ रोजी ठीक १० वाजता नैसर्गिक शेती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती – संकल्पना व वाव, जमिनीचे…

Read More

देवगड तालुक्यात शिवसेना उभारी घेणार

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला विश्वास ⚡देवगड ता.०४-: शिवसेनेचे बंडखोर आमदार जे शिंदे गटात गेले आहेत ते जनतेच्या हितासाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी गेलेले आहेत.असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक बरोबर देवगड तालुक्यातील हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहे.आणि या सर्व शिवसैनिकांच्या जोरावर या पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर…

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी संस्थानचे भूतूपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८५ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून के मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जयंत जावडेकर मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरीषद उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर संस्थांनचे राजगुरू भारती महाराज, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त लखम सावंत भोसले…

Read More

कोळेकर कुटुंबाच्या घरासाठी बबन डिसोजा, काँग्रेसचे महेंद्र सांगेलकर यांची मदत

चिरे, वाळू दिली उपलब्ध करून ⚡सावंतवाडी ता.०४-: शहरातील कोळेकर कुटुंबाचे घर उभारण्यासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरातील दानशूर व्यक्तीनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. या आव्हानाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आणि पदाधिकारी बबन डिसोजा यांनी साद दिली असून, चिरे आणि वाळू देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळे कोळेकर कुटुंबियांनी आभार व्यक्त केले…

Read More

पावसाने जनजीवन केले विस्कळीत

दोन लाखांवर झाले आर्थिक नुकसान;पाण्याच्या पातळीत मोठी वाढ वेंगुर्ला प्रतिनिधी- तालुक्यात आज सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे ठिकठिकाणी नदी ओहोळांचे पाणी रस्त्यावर येऊन काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर या पावसामुळे एकूण सुमारे २ लाख ५ हजार ४०० रुपयांचे नुकसान दाखल झाल्याची महिती आपत्ती कक्षाकडून देण्यात आली….

Read More

वेंगुर्लेतील मनोहर आडेलकर यांचा चिरेखाणीच्या पाण्यात आढळला मृतदेह

⚡वेंगुर्ले ता.०४-: शहरातील कॅम्प रामघाटरोड येथील राहिवासी मनोहर उर्फ बाळू परशुराम आडेलकर (५८) यांच्या मृतदेह येथीलच त्यांच्या घराच्या मागे असलेल्या बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आढळुन आला. याबाबत वेंगुर्ले पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मनोहर आडेलकर यांचे भाऊ उमेश उर्फ बबलू आडेलकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, रविवारी ३ जुलै…

Read More
You cannot copy content of this page