रस्त्यावर झाड कोसळल्याने बांदा – दोडामार्ग वाहतूक ठप्प….

बांदा/प्रतिनिधी
बांदा -दोडामार्ग राज्य मार्गावार पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे व बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. झाड पडले त्यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टाळली. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभामीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page