ह भ प रोहिणीताई माने परांजपे सांगणार कीर्तन
⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी विठ्ठल मंदिर मध्ये हरिनाम सप्ताह व आषाढी एकादशी उत्सव निमित्त रविवार 10 जुलै ते बुधवार 13 जुलै या कालावधीत ह.भ. प.सौ. रोहिणीताई माने- परांजपे (पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केलेले आहे.
संवादिनी- कौस्तुभ परांजपे, तबला- किशोर सावंत, ऑर्गन- निलेश मेस्त्री हे त्यांना साथ देणार आहेत तरी कीर्तन प्रेमींनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
