Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरात युवकाची आत्महत्या

सावंतवाडी ता.१८-:* शहरातील न्यू सबनीसवाडा परिसरात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, ही घटना आज सायंकाळी ६:३० च्या सुमारास उघडकीस आली आहे.

Read More

जेष्ठ नागरीक सेवा संघाची वार्षिक सभा २३एप्रिल रोजी

मालवण दि प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार २३ एप्रिल रोजी सकाळ नऊ वाजता यशवंत मंगल कार्यालय आचरा भंडारवाडी येथे होणार आहे. .सातारा येथील माजी प्राध्यापक चंद्रशेखर हडप यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. यावेळी जीवनगौरव, ज्येष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.तरी या…

Read More

मनसेच्या वतीने हडी येथे आयोजित अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.१८-:* मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी हेल्थकेअर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडी विभागाच्या वतीने रविवारी आयोजित संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीच्या अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शारीरिक तपासणी करून घेतली. डॉ. रघुनाथ गावडे, डॉ. किरण साळगावकर, डॉ. परेश नांदोस्कर, डॉ. आंनद…

Read More

विवाहित महिलेची छेडछाड करून तिच्यासह तिच्या पतीला मारहाण…

पोलिस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हा दाखल; संशयित चौघेही फरार… सावंतवाडी ता.१८-:* विवाहीत महिलेची छेडछाड करुन तिला व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात चार जणाविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी रात्री नऊ च्या सुमारास शहरातील एका भागात घडला आहे. दरम्यान ह्या गुन्ह्यात मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या…

Read More

हिवाळे, ओवळीये, शिरवंडे सोसायटीवर भाजपचा झेंडा

भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलचा एकतर्फी विजय : सर्व १३ जागा ताब्यात *⚡मालवण ता.१८-:* मालवण तालुक्यातील लक्षवेधी अश्या हिवाळे, ओवळीये, शिरवंडे विविध कार्यकारी सोसायटीवर भाजप पुरस्कृत स्वराज्य विकास पॅनलने विजय मिळवला. विरोधकांची धूळधाण उडवत सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट आणि म्हाळाईवाडी महिला मंडळयांच्या वतीने तळवडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी ता.१८-:हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने म्हाळाईवाडी महिला मंडळ तळवडे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे आरोग्य शिबिर म्हाळाईवाडी येथील आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नेत्र तपासणी नंतर ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे त्यांना 50 टक्के सवलतीच्या…

Read More

सोबत येतील त्यांना एकत्र घेऊन सिंधुदुर्गातील निवडणुकीत विजय मिळवा – वर्षा गायकवाड

मालवण ता.१८-:* राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव काका कुडाळकर व सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे माजी प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी भेट घेत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस असे दोन पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय मिळवून देत असाल तसेच भविष्यात आपल्या सोबत अजून कोणी येणार…

Read More

वीज कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युईटी मिळवून द्या

राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष सांगेलकर यांच्याकडे मागणी;कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन सावंतवाडी ता.१८-:* विज महावितरण कंपनीतील निवुत विज कामगार यांची ग्रॅजुईटी रोजंदारी काळातील (उपदान) कमी दिल्याप्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी या वीज कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून हा प्रश्न राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मार्फत सोडवण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला…

Read More

खरीप हंगाम नियोजनबाबत आढावा बैठक

खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम के गावडे होते उपस्थित वेंगुर्ले       सन २०२२ खरीप हंगाम आढावा बैठक वेंगुर्ले तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात चेअरमन एम.के.गावडे यांच्या  अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  खत कंपन्यांनी आपले विक्री धोरण बदलले असल्यामुळे खत रक्कम रोख द्यावी लागते.नेहमी पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात घेऊन यावेळी येत्या खरीप हंगामात संस्थानी काही रक्कम आगाऊ…

Read More

जामसांडे येथे अपंगांना बसविण्यात आले जयपूर फूट

रोटरी क्लब मँगो सिटी देवगड, रोटरी क्लब कोल्हापूर व लोक कल्याण मंडळाचे आयोजन देवगड ता.१८-:* रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि लोक कल्याण मंडळ द्वारा जयपूर फूट बसवणेचा कॅम्प दि. १८ एप्रिल २०२२ रोजी सांस्कृतिक भवन जामसंडे येथे आयोजित केला होता,सर्व लाभार्थीना ( ज्यांचे कृत्रिम पायासाठी मोजमाप घेतले…

Read More
You cannot copy content of this page