⚡कणकवली ता.२३-: तबलावादक अपर्णा उमेश दिवेकर( वय 53 )यांचे नुकतेच पुणे येथे अपघाती निधन झाले . तबला विशारद दिवेकर बाई यांचा कणकवली येथे काही वर्ष तबला वादनाचा क्लास सुरू होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे येथे स्थायिक होऊन त्याठिकाणी त्या तबला वादनाचे क्लास घेत होत्या .
शांत, हुशार व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. अल्पकाळ कणकवलीत राहूनही त्यांनी अनेक मुलांना तबला वादनाची गोडी लावली. ॲड. अमृता विजय गांवकर, ॲड. मितेश चिंदरकर, प्रथमेश वालावलकर, संकेत महाडेश्वर, देवदत्त अरदकर असे अनेक विद्यार्थी त्यांच्या कडे तबला शिकत होते. कीर्तन , सुगम संगीत साठी त्या उत्तम तबला साथ करायच्या. पुणे येथे त्यांना आशा भोसले पुरस्काराने गौरविण्यात आले होते . नुकतेच पंढरपूर वारीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी तबलावादन करून वारकऱ्यांची सेवा केली होती . त्यांच्या पश्चात मुलगा कौस्तुभ ,पती उमेश , सासू , आई आणि 2 बहिणी आहेत .
