शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी
वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

⚡कणकवली ता.२३-:
न्यायाची चाड व अन्यायाची चीड ‘ हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.


शिक्षक समितीच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्यानिमित्ताने तालुका शाखा कणकवलीच्यावतीने जि. प. प्राथमिक शाळा जानवली मारुती मंदिर येथे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम व इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक समिती कणकवली सातत्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिक्षक समिती कणकवलीने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ केला. समितीच्या अनेक उपक्रमशील शिक्षक सदस्यांच्या सहकार्यातून शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या व्हिडिओची निर्मिती करून ते व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला यूट्यूब चैनलवर प्रसारित करण्यात येणार आहेत.हा उपक्रम सर्व विद्यार्थी – शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप धामापुरकर, प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष कुडाळकर, अजय तांबे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, उपाध्यक्ष सदानंद ठाकूर, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, महिला आघाडी सचिव नेहा मोरे, कार्यालयीन चिटणीस समीर पाटील, सहसचिव संतोष कांबळे, विभाग अध्यक्ष हेमंत राणे, प्रसिद्धीप्रमुख प्रविण कुबल, कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणारे जानवली मारुती मंदिर शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर, उपक्रमशील शिक्षिका मंजिरी मराठे, सुजाता साठविलकर, राजेश कदम, सुशांत मर्गज, सचिन सावंत, संदीप जाधव, संदीप गोसावी, स्नेहल गोसावी, श्रीकृष्ण कांबळी आदी समिती सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले.

You cannot copy content of this page