⚡बांदा ता.२३-: कोंडुरा येथील विद्युत खांब वेली झुडुपांनी वेढलेले असून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी दहा ते बारा तास ग्रामस्थांना अंधारात रहावे लागते. मात्र कोंडुरा ग्रामस्थांनी एकत्र येऊन विद्युत वाहिनीवर, खांबावर वाढलेली झाडी झुडपे वायरमन यांच्या मदतीने तोडून बाजूला केली आणि विद्युत खांब व वाहिन्या मोकळ्या करुन दिल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून विद्युत महावितरण विभाग तसेच गावातून ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
लोकसहभागातून केलेल्या याकामात कृष्णा शेडगे, प्रसाद मडूरकर, गोविंद कदम, अनिकेत बर्डे, ज्ञानेश्वर सावंत, भावेश मडूरकर, एकनाथ मुळीक, विजय मुळीक, उल्हास मुळीक, अजित गवस, शंकर कांबळी, देवेन्द्र मडूरकर, नारायण मडूरकर, बाळा मेस्री, आनंद मुळीक, उदय मुळीक, ग्रामस्थ व वायरमन सावंत आदींनी मदत केली.
