जिल्ह्यातील घरफोड्या प्रकरणी सोलापूर येथून संशयित ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गेले काही महिने होत असलेल्या घरफोड्यां प्रकरणातील संशयित आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मालवण पोलिसांनी त्याला सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडी येथे झालेल्या घरफोड्या प्रकरणी त्याला सोमवारी सावंतवाडी पोलिस ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत.

You cannot copy content of this page