⚡वेंगुर्ला ता.२३-: अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे चर्चासत्र घेण्यात आले. या जनजागृती अभियानात शिक्षक व पालकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास गावडे यांनी केले. यावेळी समितीचे चितामणी धुरी व मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
अंमली पदार्थ विरोधी चर्चासत्र
