Headlines

Global Maharashtra Breaking News

आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू:संदेश पारकर

विनयभंगाच्या आरोपात दोषी आढळल्यास खरात यांच्यावरही कारवाई करावी ⚡कणकवली ता.१७-: आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू आहेत. वारंवार असे गुन्हे त्यांनी केले आहेत. काही गुन्ह्यांत ते जामिनावर सुटले आहेत. तो जामीन रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला…

Read More

सावंतवाडीत २० रोजी मराठा समाजाच्यावतीने विनायक मेटे यांना वाहणार श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम येत्या शनिवार दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आर पी डी हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसंग्रामचे नेते मा. आम. विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नियोजन बैठक सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे यांच्या…

Read More

भारतीय मजदुर संघाचा जिल्हा राजधानीत लक्षवेधी मोर्चा

सिंधुदुर्गनगरी ता १७राज्यातील कामगारांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कामगार एकवटले असून या कामगारांनी आज भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. तसेच विविध गगनभेदी…

Read More

शिक्षक न दिल्याने शाळेला ठोकले टाळे

केंद्र शाळा सुकळवाडचे ग्रामस्थ झाले आक्रमक सिंधुदुर्गनगरी ता १७जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही व प्रशासनाकडून आश्वासन देऊनही ११६ पटसंख्या असलेला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड या शाळेला आवश्यक असलेले शिक्षक नियुक्त केले जात नसल्याने अखेर आज पालक व ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप ठोकले. तर जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा उघडू…

Read More

सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच…

⚡कणकवली ता.१७-: मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे ज्या समस्या आहेत.त्या समस्या सोडत नाही.तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते ,माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी घेतला आहे.जोपर्यंत मागण्यांबाबतीत प्रत्यक्ष कामे होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याच्या मुद्यांवर नागेश मोरये ठाम आहेत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच आहे. प्रशासनाने…

Read More

वृक्ष संवर्धनातून समाजामध्ये आदर्श घडवा

सतीश सावंत ;कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून रायवळ आंबा लागवड ⚡कणकवली ता.१७-: सह्याद्री पट्टयातील वनसंपदा नष्टा होत आहे. याचा परिणाम जैववैविधता कमी होत आहे. पारंपारिक वृक्षाची जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. दुर्मीळ जातीच्या वृक्ष लागवडीने समाजामध्ये एक आदर्श विद्यार्थ्यांनी घडवावा असे आवाहन कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ध्वज…

Read More

आरोस धनगरवाडी रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर

मनीषा परब : प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप ⚡बांदा ता.१७-: आरोस-धनगरवाडी ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी सुस्थितीत असा रस्ता उपलब्ध नाही. तसेच नळयोजना, वीज समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब यांच्याकडे केली. रस्ता व पाण्यासंबंधी कामे मंजूर असून ती पावसाळ्यानंतर लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे आश्वासन आरोस मनीषा परब यांनी ग्रामस्थांना दिले. बाळा परब…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत रोशन साळुंके व श्रेयस राठोड प्रथम

⚡मालवण ता.१७-: नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृति वक्तृत्व स्पर्धा ग्रंथालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुकास्तरीय गटात रोशन कैलास साळुंके व जिल्हास्तरीय गटात श्रेयस बंडू राठोड याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, परिक्षक संग्राम कासले व ॲड. पलाश चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. तालुकास्तरीय…

Read More

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत

⚡मालवण ता.१७-: शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ६१ व्या हौशी मराठी…

Read More

वायरी येथे १९ रोजी डबलबारी भजन सामना

⚡मालवण ता.१७-: वायरी भूतनाथ येथील श्री जय भूतनाथ युवा प्रतिष्ठानतर्फे गोपाळकाल्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त १९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वा. तेथील भूतनाथ मंदिर येथे डबलबारीचा सामना आयोजित केला आहे. हा सामना वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके (पखवाज-योगेश सामंत) व वाडेगती भजन मंडळ, बांदेवाडी, देवगडचे बुवा जयप्रकाश गावकर (पखवाज-रितेश पांचाळ) यांच्यात…

Read More
You cannot copy content of this page