⚡कणकवली ता.१७-: मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे ज्या समस्या आहेत.त्या समस्या सोडत नाही.तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते ,माजी बांधकाम सभापती नागेश मोरये यांनी घेतला आहे.जोपर्यंत मागण्यांबाबतीत प्रत्यक्ष कामे होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याच्या मुद्यांवर नागेश मोरये ठाम आहेत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच आहे.
प्रशासनाने अद्यापही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही.काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव उपोषणस्थळी येत नाहीत.त्यामुळे ही लढाई सर्वसामान्य लोकांची आहे.त्यामुळे तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपोषणस्थळी असलदे माजी सरपंच दिलीप फोडके,विजय म्हाडेश्वर,अशोक बिडये आदींसह ग्रामस्थ उपस्थित आहेत.
