वृक्ष संवर्धनातून समाजामध्ये आदर्श घडवा

सतीश सावंत ;कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून रायवळ आंबा लागवड

⚡कणकवली ता.१७-: सह्याद्री पट्टयातील वनसंपदा नष्टा होत आहे. याचा परिणाम जैववैविधता कमी होत आहे. पारंपारिक वृक्षाची जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. दुर्मीळ जातीच्या वृक्ष लागवडीने समाजामध्ये एक आदर्श विद्यार्थ्यांनी घडवावा असे आवाहन कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ध्वज दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेच्यावतीने ७५ रायवळ आंबा वृक्ष लागवड करण्यात आली.कनेडी ते फोंडा या रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना श्री. सावंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, कोकणाच्या भूमीमध्ये रायवळ आंबा, काजू ,नारळ या फळाला अधिक महत्त्व आहे. याचबरोबर पिंपळ,वड, पळस असे वृक्ष दुर्मिळ होऊ लागले आहेत. या वृक्षाचे जतन करणे ही नव्या पिढीची जबाबदारी आहे. सह्याद्री पट्ट्यांमध्ये पूर्वीच्या काळात असलेली वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. ही वनसंपदा पुन्हा एकदा अस्तित्वात येण्यासाठी पारंपारिक वृक्षांची लागवड आवश्यक आहे. ज्या वृक्षापासून फळे आणि सावली मिळते अशा वृक्षाची लागवड करून एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले. खडशी नदीच्या परिसरात फोंडा रस्त्यावर एमसीसी विद्यार्थी आणि प्रशालेच्या शिक्षकांच्या संयुक्त विद्यमाने ही वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने ७५ वृक्षांचा पुरवठा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शालेय समिती सदस्य तुषार सावंत तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.यावेळी ७५ वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थांने जबाबदारी दिलेल्या वृक्षाचे जतन करावे. उन्हाळी हंगामात या झाडांना पाणी द्यावे, त्याचे रक्षण करावे अशी सुचना यावेळी करण्यात आली.

You cannot copy content of this page