Global Maharashtra Breaking News

ध्येय्याने झपाटलेली माणसेच आयुष्यात
यशस्वी होतात :पंढरीनाथ राणे

फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी ⚡कणकवली ता.२३-: सामान्य ज्ञानाची तयारी स्वतः करावी लागते. नियमित वर्तमानपत्रे वाचली म्हणजे सामान्य ज्ञानाची तयारी नीट होते. रेडीमेड सामान्य ज्ञान धोका देते. एन.सी.आर.टीच्या सर्व पुस्तकांचे नोट्स वाचा.नोट्स स्वतः तयार केले पाहिजेत. जिद्दीने अभ्यास करत असताना आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे.ध्येय्याने झपाटलेली माणसेच आयुष्यात यशस्वी होतात. असे प्रतिपादन…

Read More

प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी एक झाड लावण्याचा संकल्प करा. – श्रीकृष्ण परिट

⚡मालवण ता.२३-: प्रत्येकजण सावलीसाठी नेहमी झाड शोधतो त्यामुळे झाड लावून ते मोठ करणे ही सुध्दा प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाड फक्त लावून चालणार नाही तर लावलेल्या झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करून ते झाड मोठे करणे ही सुध्दा आपलीच जबाबदारी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची होणारी कत्तल थांबली पाहिजे. वृक्षतोडीमुळे भविष्यातील धोके टाळायचे असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांने…

Read More

जामसंडे मध्ये साहेब,आम्ही सदैव तुमच्या सोबत’ बॅनर झळकले

⚡देवगड ता.२३-: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मध्ये राजकीय भूकंप होऊन राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू झाली.यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी शिवसेनेच्या ३७ आमदारांसोबत अन्य अपक्ष आमदार समवेत वेगळा शिवसेना गट निर्माण केला . राज्यात ठिकठिकाणी संघर्ष घोषणाबाजी,बॅनर बाजी सुरू झाली .त्याचे पडसाद देवगड जामसंडे शहरात उमटले आहेत जामसंडेमध्ये…

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत २५ जून ते १ जुलै कालावधीत देवगड तालुक्यात कृषी संजीवनी मोहिम

देवगडस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५जून ते १ जुलै या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक कृषी कार्य सहाय्यका मार्फत दररोज एका गावात शेतकरी मेळावे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी संजीवनी मोहिमेची सांगता १ जुलै रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे . या मोहिमेद्वारे कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी कृषी…

Read More

देवगड तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी- मिलिंद साटम

⚡देवगड ता.२३-: तालुक्यातील शिवसैनिक हा सच्चा शिवसैनिक असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती व शिवसैनिकाशी असलेली जवळीक आपुलकी यामुळे देवगड तालुक्यातील शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे.व या पुढील काळात देखील या तालुक्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी ठाम पणे…

Read More

काळसे हायस्कूलला प्रगतीपथावर नेण्यामध्ये मुख्याध्यापक श्री. वालावलकर सर यांचे योगदान बहुमोल.”- सी. ए. श्री हेमंत परब

⚡मालवण ता.२३-: श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी आणि बारावी बॅचचा निकाल सातत्याने १०० टक्के लावून आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत काळसे हायस्कूलला प्रगतीपथावर नेण्यामध्ये श्री. किशोर वालावलकर सर यांचे बहुमोल योगदान आहे. “असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सी. ए. श्री हेमंत परब यांनी काळसे हायस्कूलचे…

Read More

” यशापशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी “

प्रा. राजाराम परब :काळसे येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन. ⚡मालवण ता.२३-: विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता यशामध्ये आणि अपयशामध्ये जो संतुलित राहतो तो खरा विद्यार्थी. तुम्ही किती बुद्धिमान किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्या कामात किती सातत्य आहे यावरून तुमचे यश ठरत असते. तसेच तुमची परिस्थिती कशी असली तरी चालेल यशस्वी…

Read More

बांदा रोटरी क्लब कडून गरजूंना आर्थिक मदत

⚡बांदा ता.२३-: रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात बांदा गावात उपक्रम राबवत आहेत. बांदा दशक्रोशीतील गावातील लोकांना या उपक्रमाचा मोठा फायदा व्हावा म्हणून योग्य नियोजन रोटरी क्लब बांदा कडून करण्यात येत आहे. अशाच सामाजिक उपक्रमातून इन्सुली येथील श्रीमती उत्कर्षा लक्ष्मण कुडव या गरजू कुटुंबाला रोटरी क्लब ऑफ बांदा…

Read More

फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी सावंतवाडीत उद्या यज्ञ

भाजपचे आयोजन: भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे संजू परब, अजय गोंदावळे यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २४ जून रोजी सावंतवाडी भाजप कडून शहरातील विठ्ठल मंदिरात पुरोहितांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चाराच्या गजरात यज्ञ करण्याचे आयोजन केले असून, या…

Read More

वेंगुर्ले येथे उद्या अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र”

‘आम्ही वेंगुर्लेकर’ चे आयोजन ⚡वेंगुर्ले ता.२३-: वेंगुर्ले येथे उद्या शुक्रवार 24 जून रोजी ‘आम्ही वेंगुर्लेकर’ तर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त “जनजागृती व प्रबोधनात्मक चर्चासत्र” सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. अंमली पदार्थ विरोधी सप्ताह शासनामार्फत दिनांक 19 जून ते ते 26 जून या कालावधीतआयोजित केला असून 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिन…

Read More
You cannot copy content of this page