⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथे एस.स्टी बस चालू करण्याची अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण झाली.आणि आज सकाळी ९.०० वा सदर पहीली बस दाखल झाली.यावेळी शेळीचीवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी या एस.टी.बसचे जंगी स्वागत केले आहे .यावेळी बस चालक सचिन मर्ये व वाहक निलेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ही बस सेवा चालू करण्यासाठी आ. नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न तसेच गोट्या सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, ग्रा.पं.सदस्या.सौ.सानिका गावडे,सचिन गावडे आणि ग्रा.पं.तोंडवली बावशी यांचेही विशेष प्रयत्न लाभले.ही बस गावात दाखल झाली यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ताराम मांडवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला.
यावेळी उपस्थित भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, ग्रा.पं.सदस्य रवींद्र बोभाटे,दिनेश कांडर सौ.सानिका गावडे, तंटा मुक्ती अध्यक्ष विलास कांडर,नांदगाव तंटा मुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले, सचिन गावडे,सिद्धेश बडमे,अनंत साळुंखे,सीताराम तांबे, जयराम खंडबले,दिनकर पाष्टे,जयवंत रांबाडे,पुरुषोत्तम पाष्टे,रवींद्र रांबाडे,चंद्रकांत रांबाडे,गंगाराम रांबाडे,.दशरथ मांजलकर,रामचंद्र तांबे,रामचंद्र तरल,श्री. बाळा रांबाडे आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
बावशी शेळीचीवाडी पहीली बस दाखल ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केले स्वागत
