अखेर गोव्यातील काँग्रेसचे आठ आमदार ‘भाजपवासी’

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे.

⚡पणजी दि.१४-: गोव्यात अगदी सकाळपासूनच सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांच्या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. या सोबतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

You cannot copy content of this page